*स्वप्नात कोण आहे*

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 11, 2017, 06:54:58 AM

Previous topic - Next topic
*हृदयाच्या स्पंदनात*
*आवाज येतो आहे*
*ती आज ही तुझीचं आहे*
*फक्त तुझा पाहण्याचा*
*दृष्टीकोण बदलला आहे*

*खूप दुखावलं तिला*
*तू पण तिनं तू दिलेल्या*
*दुःखाना बाजूला केलं आहे*
*आपलंसं वाटणार कोण आहे*

*जरा विचार करून बघ*
*तिच्या आठवणीनं शिवाय*
*तारणार तुला दुसरं कोण आहे*

*डोकावून बघ जरा*
*मागच्या जुन्या आठवणीत*
*तुझ्या दुःखा वर पांघरून*
*घालणार  कोण आहे*

*नात्यांच्या गर्तेत हरवला*
*आहेस खूप तू नात्यांनी*
*जखमा खूप दिल्या तुला*
*पण हळुवार त्या जखमेवरून*
*हात फिरवणार कोण आहे*

*टोचून जरी बोललास तू*
*समजून घेणार कोण आहे*
*स्वप्न खूप पाहिलेस तू*
*पण तिच्या शिवाय*
*स्वप्नात कोण आहे*


*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर