रंगपंचमी

Started by Rupesh Gade, March 12, 2017, 11:53:27 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

रंगात तुझ्या होळीच्या माझा रंग असु दे,
गालावर तुझ्या दोन रंग माझे हि दिसु दे,
स्पर्श करता रंग तुला तो हि रंग बदलेल,
आनंदाच्या या सणा मध्ये तो हि मनोशोक्त उधळेल,
चेहऱ्यावर तुझ्या रंगांचा उद्या घडीमार असेल,
माझा प्रेमाचा रंग मात्र तुझ्यावर ठळक पणे दिसेल,
दोन दिवसांचा हा सण वर्षभर लक्षात राहेल,
आणि पुढच्या वर्षी या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहेल...

                                          -   रुपेश मारुती गाडे