आज का वाटते...!!

Started by श्री. प्रकाश साळवी, March 16, 2017, 08:12:59 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आज का वाटते ...!!
---------------
आज का वाटते पाणी असे पेटले हे
आज का वाटते गाणे मज भेटले हे
**
या पेटलेल्या आसवांना विझवा कुणी हो
आज का वाटते गाणे असे भिजले हे
**
तुझ्या वंचनांनी आज फुले ही गंधित झाली
वंचनांना कुणी ताजव्यात तोलले हे
**
गाणे कुणाचे गाणार वेगळा तो
हे शिवधनुष्य आज कोणी पेलले हे
**
भिजल्या पायवाटा कुणाच्या आसवांनी ?
की कुणी हे कुणाचे रक्त सांडले हे ?
**
आरे वर्तमाना तुझी का बोलती बंद झाली ?
मी का उगा हे आज - उद्याचे भविष्य मांडले हे
**
प्रकाश साळवी
१५/०३/२०१७