अस्तित्व

Started by Rajesh khakre, March 17, 2017, 05:03:32 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

 अस्तित्व

ओल्या शेतात धान्याची पेरणी करताना
हुरडा झालेल्या कणसाची कापणी करताना
मातीमोल भावाने पिकाची विक्री बघताना
हातावर उमटलेल्या प्रत्येक चरबटावर
शेतकरी शोधत राहतो स्वतः चं अस्तित्व दरवर्षी...

या भल्यामोठ्या जगात वावरतांना
मान-अपमान खाचखळगे पचवतांता
सुख-दुःखाची गोळाबेरीज करतांना
उगवणाऱ्या सूर्याच्या प्रत्येक किरणांवर
माणूस शोधत राहतो स्वतः चे अस्तित्व दरदिवशी

आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन जगासमोर मांडताना
पद प्रतिष्ठा पैसा यात गुरफटून जात असतांना
दुसरीकडे गरीब पोटाची टीचभर खळगी भरतांना
शर्टावरील ठिगळात शोधत राहतो
त्याच्या मुलाच्या भविष्याचे अस्तित्व दरवेळी

प्रत्येकजण लढतोय स्वतःच्या अस्तित्वाची लढाई
मोठा, श्रेष्ठ , पैसेवाला बनण्यासाठी चालू आहे चढाई
विश्वास-अविश्वास, प्रेम-द्वेषाच्या बहुरंगी वातावरणात
मी शोधत राहतो माणुसकीचे अस्तित्व सभोवताली प्रत्येकवेळी
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in