॥ अगं, निदान स्वप्नात तरी माझे व्हायचे होते ॥

Started by siddheshwar vilas patankar, March 22, 2017, 07:15:00 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



का अस्सा सैल पडलो मी?

कुठे म्हणून अडलो मी ?

त्या वेदना जरी माझ्या असल्या

तरी का त्यात गाडला गेलो मी ?॥

चेहरा जुना असला तरी

भाव तो मात्र नवा होता

डोळे निरागस होऊनि शोधत होते

तुझाच चेहरा जणू हवा होता ॥

एक असहाय्य्य भिकारी

जो कधी काळी तुझा मित्र होता

हात मागताक्षणी आठवतोय मजला

चेहरा तुझा विचित्र होता ॥

किती सहज तोडले माझ्याशी नाते

जागीच थांबलो मी अस्साच

तू दूर, किती दूर गेलीस

अगं, निदान स्वप्नात तरी माझे व्हायचे होते ॥

ते हात आत्तापण असेच पसरलेले आहेत

डोळे फक्त तुझीच वाट पाहात आहेत

तहान भूक विसरून सारी , मी तिथेच थांबलो आहे

लोक मात्र मला भिकारी समजून अजूनही भीक देत आहेत ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C  :-[
सिद्धेश्वर विलास पाटणकर C