काय शञु मिजाज करेल.

Started by कदम, March 25, 2017, 11:09:13 PM

Previous topic - Next topic

कदम


काय शञु रूबाब करेल
आम्हावर स्वारी करेल
एका अनेका उभा चिरेन
भरकटत दाही दिशेला फिरेल...

काय शञु आगाज करेल
आघात आम्हां वरती करेल
जीता गाडून पुर्ता उरेंन
वाचा पुर्ती बोबडी वळेल...

काय शञु वैर करेल
आम्हा वरती वार करेल
झेलुन मनगटी अशी शिकार करेन
चिथडे चिथडे हजार करेन...

काय शञु संहार करेल
असा अहंकार जिरेल
कसा स्थापित साम्राज्य करेल
यम सदनीही क्षमायाचन करेल...