माझी मायं.....

Started by suraj-123, March 26, 2017, 06:27:18 AM

Previous topic - Next topic

suraj-123

माझी मायं......
------------------

माझ्या मायनं मजं,
जनमं दिलयं.
आयुष्यभराचं पुण्य,
  तीचं मला लाभलयं....

माझ्या मायनं मजं,
लई कष्टानं पाेसलयं.
तलहाताच्या फाेडाप्रमानं,
तीनं मजं जनमभरं जपलयं.
आयुष्यभराचं पुण्य,
तीचं मला लाभलयं....

लाेकांच्या शेतांसनी कष्ट करूनीयां,
तीनं मजं शीकवलयं,
मायेच्या तीच्या उबेनं,
पंख पांघरायला शीकवलयं.
आयुष्यभराचं पुण्य,
तीचं मला लाभलयं....

स्वतः चटणी-भाकरी खाऊनीयां,
मजं गाेडा-धाेडाचं चारलयं.
स्वतः उपाशी राहुनीयां,
मजं पाेटभरं जेवु घातलयं.
आयुष्यभराचं पुण्य,
तीचं मला लाभलयं....

कडाक्याच्या ऊन्हामंधी,
तहान-भुक हरवुनं काम तीनं केलंयां.
पैका कमवुनं मजं,
खुप सारं सिकवलयं.
आयुष्यभराचं पुण्य,
तीचं मला लाभलयं....

मायनं  कधी स्वतः अंगा,
कपरां ना नवा घेतलां.
दर पारव्याला ती मजं,
सीवायची नवा कपरां.
तीच्यासारखा नाही कुणास,
मायेचा पाझरां.
चाेचीतलां चारा मजं,
देत गेली सारा.
अशी ही माय मजं,
    माेठ्या पुण्यानं लाभलीयां....
    माेठ्या पुण्यानं लाभलीया....

                      कवी- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                         (९०७५८३८३५४)
                         (ता.- मुरबाड, जि.-ठाणे.)