संत 'गाडगे-बाबा'......

Started by suraj-123, March 26, 2017, 09:25:18 AM

Previous topic - Next topic

suraj-123

संत गाडगे बाबा.......
--------------------

अंगावरी फाटक्या कपड्यांमंधी.
हातामंधी घेऊन झाडु,
गावाेगावी फीरून सारा.
काढी ते केर-कचरा सारा.
असा आमुचा गाडगे बाबा.
दीसायला लयं साधा भाेला....

आषाढी-कार्तीकीला.
बाबा जायचं पंढरपुरच्या वारी.
कधीचं ना गेले विठ्ठलाच्या मंदीरी.
परं आसं माञ सदा,
वारकऱ्यांच्या सेवेपरी.....

पंढरपुरी विठ्ठलाच्या या नगरी.
बाबा दिसभरं स्वच्छता करी.
अनं रातीला त्यांचा कीर्तन लयं भारी.

सर्व आयुष्य लाेक कल्यानासं घालीवलं.
परं स्वतःस कधी ना अंगा,
ईतभरं कापरं ना सीवलं.
फाटक्या कपऱ्यातचं आयुष्य काढलं.
लाेकांसाठी माञ आपलं प्राण वेचलं

घाणीतल्या दुनीयेतं स्वर्ग त्यासनीं ऊभारला.
चीमुटभर घास कुणाचा ताेंडी न घातलां.
लाेकांच्या जेवणाचं ताटं त्यानी उचललं.
पर लाडवा -बुद्धीचा घासं नं कधी ताेंडी टाकला.

धरमासाला स्वतः बांधुनं कधी,
नावं ना आपलं कुठं लावलं.
कीर्तनातुन आपल्या स्वच्छतेचा संदेश दिला.
अंद्धश्रद्धेला कधी त्यांसनी था रा ना दिला.
जातीयतेच्या बुडाला ताेडुन,
मार्ग एकीची आखलां.
असा आमुचा बाबा लयं साधा भाेला.


                      कवी- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                         (९०७५८३८३५४)
                         (ता.- मुरबाड, जि.-ठाणे.)