पाऊलवाट

Started by akshay nehare, March 28, 2017, 09:11:57 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

अंधार घेऊन मिरवतो मी
छायेचा खेळ कशाला
काळोख तर गिरवतो मी
दिवसाची वेळ कशाला
शोधुन तर दाखवं मजला, पापण्यांखाली आसवं कशाला..

लपंडावर रोज खेळातो मी
शोधाचा प्रारंभ कशाला
आसवां खालीच लपतो मी
खेळाचाच अंत कशाला
शोधुन तर दाखवं मजला, पापण्यांखाली आसवं कशाला..

रोज विरहात झोपतो मी
पांघरुण सोबतीच कशाला
सुर्या सोबत उगवतो मी
उगाच का जागतो कशाला
शोधुन तर दाखवं मजला, पापण्यांखाली आसवं कशाला..

जखमेवरचा इलाज मी
मलम नाइलाजाचा कशाला
घावांवरचा उपाय मी
ठेका निरुपयोगाचा कशाला
शोधुन तर दाखवं मजला, पापण्यांखाली आसवं कशाला..

कर्णमधुर असेलही मी
कर्णकटुही आव कशाला
कायद्यातही होतो मी
बेकायद्यात नाव कशाला
शोधुन तर दाखवं मजला, पापण्यांखाली आसवं कशाला..

दु:खाच्या अलिकडे मी
सुखाची ओंजळ कशाला
सरणाच्या पलीकडे मी
मरणाचा आक्रोश कशाला
शोधुन तर दाखवं मजला, पापण्यांखाली आसवं कशाला..
शोधुन तर दाखवं मजला, पापण्यांखाली आसवं कशाला..

                       - अक्षय नेहरे, पुणे  ☎: ७०२०३९७०२०