हिरवेगार कुठे गाव दिसेना

Started by कदम, March 31, 2017, 01:22:22 AM

Previous topic - Next topic

कदम


धरणी माता जागा देईना

धरणी माता जागा देईना
काही केल्या राग शमेना
अशी माझ्यावर कोपली
श्रावणातही मिश्किल हसली...

धरणी माता जागा देईना
सुखद काही वर्षाव करीना
तलावात मृगजळा विना काही दिसेना
आपात मज हा आता सोसेना...

धरणी माता जागा देईना
पाल्ये तिची वने झाली जुनी
माथ्यावर ओकतोय सुर्य अग्नी
केली लेकरांवरची माया अळणी...

धरणी माता जागा देईना
कुशीत तिच्या थारा देईना
पायांची होते लाही लाही
थेंबाथेंबा साठी भटकंती ठाई ठाई...

धरणी माता जागा देईना
वातावरणाची झीज भरेना
काही केल्या राग शमेना
हिरवेगार कुठे गाव दिसेना...