राजे

Started by Asu@16, April 04, 2017, 12:08:35 PM

Previous topic - Next topic

Asu@16

राजे

कोण म्हणतो राजे गेले
रूप पालटून परत आले
गाडी घोडे , रथ गेले
मोटारींचे ताफे आले

सम्राटांची राज घराणी
बाकी राजे भरती पाणी ,
मतदारसंघात सत्ता खाशी
कायदेकानू यांची दासी

मते मागण्या येती घरी
पंचवार्षिक सत्ताधारी
मुंबई दिल्लीचे वारकरी
ना फिरकतील आपुल्या दारी

समाजसेवक राजे जाणती
मतदारांची कशास गणती
जनता त्यांच्या सेवेसाठी
गरिबांच्या कुणी ना पाठी

कररूपे नजराणे घेती
भत्ते तनखे ह्यांच्या हाती
स्थिती सगळी प्रलयंकारी 
तरीही, राज्य आपुले कल्याणकारी !

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita