'आठवणींचे मन'...

Started by suraj-123, April 09, 2017, 02:46:37 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'आठवणींचे मन'
-------------------

हातात पेन-वही घेतली की,
काहीतरी लिहावसं वाटतं.
एकदा लिहायला सुरूवात केली की,
सारं काही आठवत जातं.
अनं आठवणींना दुजाेरा मिळाला की,
सारं काही पुन्हा आपलसं करावं वाटतं.....

नकळतचं हे मन कुठं जाऊन भरकटतं.
हळुचं आठवणींच्या जगात जाऊन बसतं.
हे मन कीती चंचल असतं.
ते कुठेही जाण्यासं स्वतंञ असतं.
त्याला राेखणारं कुणीचं नसतं.
जणु सारं विश्वचं त्याचं असतं.....

त्याचं जीवनं जणु फुलपाखराप्रमाणं असतं
कधी या फुलांवर कधी दुसऱ्या फुलांवर.
ते सतत भिरभिर करत असतं.
साऱ्या विश्वाची सैर करण्यात,
ते माहीरं असतं.....
ते माहीरं असतं.....

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.....
(9075838354)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे)