मराठी प्रेम पत्र

Started by dr.headhunter, April 11, 2017, 01:45:32 AM

Previous topic - Next topic

dr.headhunter

Thanks,   थांब!  याची "काही गरज नाही", किंव्हा "ठेव तुझ्याकडे" असे तू नेहमी प्रमाणे म्हणण्याआधी मला खरच आज बोलूदे थॅंक्स! खरच मनापासून अगदी तेवढंच जेवढ माझ प्रेम आहे अगदी तेवढच "मनापासून" किव्हा कदाचित त्याच्याही थोडसं आतून कुठूनतरी पण आज मला तुझ्याशी बोलायचे आहे नेहमी सारखेच मनमोकळे अर्थात तू कधी मनात काही लपवू दिलेच नाही कारण जे मला बोलायचे नसते ते देखील तुला समजते, पण तरीही मी आज तुझ्याशी तेच ते पण थोडे वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. काय आहे ना माझा एक problem आहे तू समोर असलीस ना कि माझे शब्द लुळे-पांगळे झाल्यासारखे तोंडातल्यातोंडात फरफटत, रेंगाळत राहतात कधी सरळपणे बाहेर येतच नाहीत, पण त्यात शब्दांची काहीच चूक नाहीये बरका जर चूक असेलच तर ती तुझ्या डोळ्यांची, किती खोल आहेत ते अगदी थेट तुझ्या हृदयापर्यन्त जातात पण तुझ्या मनाचा ठाव मला या जन्मात तरी लागणार नाही पुढच्या एखाद्या जन्मात chance मिळाला तर नक्की प्रयत्न करीन. खरेतर मी पुरता भारावून जातो हरवून जातो तुझ्या डोळ्यांत मग कसे बोलणार जे मला बोलायचे असते.
तुझं अचानक आयुष्यात येणं आणि भरभरून आनंद देणं हे माझ्या नशिबात लिहिलेलं असेलही कदाचित पण माझ्यासाठी मात्र तो एक अनपेक्षित सुखद झटका (surprise) होता. नाही तू पहिल्यांदा आयुष्यात आलीस त्याबद्दल नाही बोलत मी, तुझे दुसर्यां्दा माझ्या आयुष्यात येणे ही अविस्मरणीय घटना म्हणून सुवर्ण अक्षरात माझ्या मनावर कोरली गेली आहे. तू आलीस आणि सारे काही बदलले अगदी कोमेजलेल्या माझ्या मनाला एक नवतारुण्य मिळाले. मला हवे ते सारे क्षण तू दिलेस अगदी कसलाच विचार न करता जणू माझेच हरवलेले काही मलाच परत देतआहेस अश्या भावनेने दिलेस. कधी ही मला जाणीवही होवू दिली नाहीस की माझे वागणे योग्य नाही या उलट तू माझ्या बद्दल कधीही चुकीचा गैरसमजही करून घेतला नाहीस. किती सुंदर हाताळलेस तू माझ्या भावनांना, एखाद्याच्या जखमेवर कशी हळुवार फुंकर घालावी हे तुझ्याकडून शिकावे. तू समजूतदार होतीसच पण आता तू आणखी जास्त  Mature पणे मला सांभाळून घेतलेस नाहीतर कठीण होते मला स्वताला सांभाळणे.
मला तुझे हे माझ्यासोबत वागणे खूप-खूप आवडले कदाचित म्हणूनच की काय पण मी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडत गेलो. सतत तुझी आठवण, तुझा भास, आणि तुझाच विचार मनात असतो. तू देखील मला हवा तेवढा वेळ दिलास अगदी उशिरा पर्यन्त आणि म्हणेन तिथे तू आलीस. तू जेवढे मला समजून घेतलेस आणि मला समजावलेस तो प्रत्येक क्षण माझ्या प्रेमाला मिळालेला आदर आणि आधार समजून मी माझ्या आयुष्यात आनंदाने जगू शकेन. कोणत्याच गोष्टीची उणीव मला आता वाटणार नाही एवढे प्रेम तू मला दिले आहेस. खरच खूप कठीण असते आयुष्य प्रेमाशिवाय जगणे आणि प्रेमात आपली अपेक्षा तरी काय असते समोरच्याकडून पण मी तुझ्याकडून अजून काही मागावे याची मला गरज नाही वाटत, न मागता ही एवढे काही तू दिलेस प्रेम, मैत्री, जिव्हाळा,आदर, आणि त्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे विश्वासाने दिलेला वेळ ज्याच्याशी साधी तुलना करता यावी असेदेखील माझ्या आयुष्यात दुसरे काही नाही. तो प्रत्येक क्षण मनात घर करून गेला, आणि त्या जाणार्या  प्रत्येक क्षणासोबत मी तुझा Fan होत गेलो. हो मी तुला कधीच विसरू शकणार नाही कारण एवढे जवळचे अजून दुसरे कुणीतरी मिळणे या जन्मात तरी शक्य नाही. पण मला माहीत आहे तू ही मला कधीच विसरणार नाहीस कारण मला माहीत आहे जेवढे मी तुला आठवले आहे अगदी तेवढीच तू ही माझी आठवण काढली आहेस. माझी काळजी घेतली आहेस. मी म्हणेन की मी खूप प्रेम केले तुझ्यावर पण तुझ्या मैत्रितच एवढे प्रेम होते की तू माझ्यावर प्रेम करण्याची कधी गरजच भासली नाही म्हणून मी ही कधी मागितले नाही न मागता तू जे दिलेस पुरेसे आहे मला जगण्यासाठी .
पण हो !तरीही तू मला हवी आहेस सतत माझ्या सोबत, माझ्या जवळ, माझ्यापाशी. मनात तर असतेस पण माझ्या शेजारीही हवी आहेस. मनातल्या गप्पांचा आता उर भरून आलाय त्यांचे हुंडके आता मला ऐकू येवू लागले आहेत. म्हणून हवी आहेस तू मला माझ्या अगदी जवळ, माझा प्रत्येक अश्रू ओघळताना. तो प्रत्येक थेंब एक क्षण बनून माझ्या डोळ्यांतून वाहताना तू हवी आहेस मला सावरायला माझ्यापाशी. शब्द नाही बोलले तरी चालेल माझ्या डोळ्यांना बोलायचे आहे तुझ्याशी, तुला फक्त तुला पहायचे आहे. तुझा हात हातात घेवून मला फक्त तुला अनुभवायचे आहे फार वेळ नाही फक्त या पृथ्वीचे स्वताभोवती फिरणे थांबे पर्यन्त अथवा माझ्या हृदयाचे ठोके थांबे पर्यन्त. तुझ्या मांडीवर डोकेठेवून खूप खूप रडायचे आहे मला तुझ्या मिठीत शिरून सार्या  श्रुष्टिचा विसर पडावा एवढे जवळ घ्यायचे आहे तुला. काळजी करू नकोस मरणार नाही मी आता पुन्हा कारण मरण्यापेक्षा आता मला तुझ्या आठवणींच्या मांडीवर डोके ठेवून जगाला जास्त आवडेल. तू सोबत हवी आहेसच पण तू दिलेल्या सुंदर क्षणांची सोबतही मला माझ्या जीवन यात्रेत थोडे का होईना सुखावून जाईल. आणि या आठवणी मला आयुष्यभर पुरतील याची मी काळजी घेईन, आयुष्यात जेव्हा कधी आपल्या वाटा वेगळ्या होतील आणि तू मला दूरपर्यंत दिसेनासी होशील हळूच मग मी मनातल्या कप्प्यातून तुझ्या आठवणी बाहेर काढून पुन्हा-पुन्हा जगेन तुझ्या सोबत फक्त तुझ्या साठी, अजून मागू तरी काय आयुष्या कडून, तू भेटलीस आणि मला आयुष्य मिळाले आणि ते ही
"स्वच्छंदी".

amitshinde