हलका फुलका लेख

Started by sheetraj, April 14, 2017, 03:33:18 PM

Previous topic - Next topic

sheetraj


" हम से है जमाना "

जगात आपण आपला पहिला श्वास घेतो आणि सुंदरशा आयुष्याचा दारातला उंबरठा ओलांडतो . आयुष्यात आपली नाव नोंदनी करतो. हक्क गाजवायला तिथुनच सुरुवात करतो. खरच सगळ्यांना हक्क गाजवता येतो का हो? आपली हुकुमत गाजवता येण खुप जनांच्या नशिबाला येत. पण खुप कमी जनांना हे हव तस मिळत नाही. त्यांच्या नशिबात वेगळाच खेळ ठरवुन दिलेला असतो. त्या खेळाचे दोनच परीणाम पाहीला भेटतात एक तर असा माणुस खुप शक्तीमय खंबीर मन घडवतो किंवा दुसरा परीणाम म्हणजे असा माणुस वरच येत नाही , हारतच जातो . दोन्ही परीणाम म्हणजे आयुष्य नामक नाण्याच्या २ बाजु. त्या एकत्र कधीच येत नसतात.
         पहीली बाजु अशी की आपणच का हुकुमत गाजवु शकत नाही. बाकी सगळ्यांना कुणी ना कुणी साथ देनार असतच मग मलाच का नाही ? अस स्वत: ला कोचत बसायच बास.आपलेच आपल्लाल साथ देत नही , आपल्याला ओळखु शकले नाहीत म्हणजे आपण खुपच वाईट आहो अस हार मानुन जगत रहान. काय ऊपयोग मग अशा जगण्याचा? मरण चांगल ह्या पेक्षा अस रोज म्हणत जगनार्यांचा धीक्कार असो. कारण त्यांना आयुष्यच समजलेल नसत. त्याची खरी किंमतच कळलेली नसते. कारण त्यांच्या हेच लक्षात येत नसत की आयुष्य एकदा फक्त एकदाच भेटत. ह्या अशा आयुष्याचा पुरेपुर उपयोग करुन घ्यायलाच पाहीजे.
       दुसरी बाजु म्हणजे हुकुमत न गाजवताही त्यातुन खुप शिकत जाउन मनाला खंबीर बनवणारे. अशा प्रकाराच्या लोंकांना सार्या संकटांना एकट्यालाचा सामोरे जावे लागते. आई वडील सारे सारे सोबत असतात पण हवी तशी साथ त्या वेळेला भेटतच नाही . कारण त्या क्षणी आपल्यातले चांगले गुण कमी आणि वाईट गुणच ( नसुण असल्यासारखे ) बाकीच्यांना दिसतात. आपल्याला तेव्हा वाटत असत की घरातला एक जण तरी आपली बाजु घेईन पण नाही तस काहीही घडत नाही अन त्या क्षणाला एकदम वाटुन जात की आपण जन्माला आल्यापासुन एकही हक्काच माणुस मिळवु शकलो नाही किंवा बनवु पण शकलो नाही. थोड्या वेळ मनात एकदम विचित्र विचारांच वादळ निर्माण होत की खरच मग आपण काय केल आयुष्यात येउन , साधा १ सुध्दा माणुस आपलासा नाही बनवु शकलो. मग तिथुन सुरु होतो स्वत: च परिक्षण . आपण इतके वाईट वागतो सगळ्यांशी की त्यांना आपल्यातले फक्त वाईटच गुण दिसतात. की आपण आहोतच तसे वाईट. जस काही चांगुलपणा नाहीच आपल्यात. खरच किती सारे प्रश्न समोर येऊन ऊभा रहातात. थोड स्वार्थी मन मग हळुच म्हनु लागत नाही , ह्या सार्यांनी आपल्याला अजुन पुर्ण ओळखलेलच नाहीये. आपण  अशे नाहीतच. नाही देत ना साथ तर नाही तर नाही...आपण स्वत: च करु स्वत: ची मदत. त्या क्षणाला आपण स्वत:ला अशाप्रकारे बदलतो की आपल्यात एवढी ताकद आलीच कुठुन हे आपल आपल्यालाही कळत नाही. तेव्हापासुन मन इतक खंबीर करतो की कुठलही कसही वादळ , संकट येवो आपण कुणाच्याच सोबतीची वाट नाही पाहत तर स्वत:च धीराने सामोरे जातो. पण कस आहे ना माणुस म्हणल की मन आलच. मन आल की भावना आल्याच . संकटाना सामोरी जातो तरी एक क्षण का होईना पण वाटुन जातच की का सगळे आपल्याशी अस वागत असतील? का नेहमीचाच ठपका ठेवत असतील ? आपल्याली का असच ग्रुहीत धरत असतील? का एक वेगळा माणुस म्हणुन पाहत नसतील? पुन्हा अशा विचारांत मन गुरफटत. पण परत स्वत:ची समजुत स्वत: काढत कारण सोबत कुणीच नसत ना मग आपणच आपले सोबती बनतो. खुप वेळेस ठेचा लागतात, चुका होतात कारण आपण स्वत:च सार करत असतो. पण ह्या चुकांमधन माणुस शिकत जातो, घडत जातो. दगडावर घाव करुन सुंदर कलाक्रुती घडत जाते तसे स्वत:  केलेल्या चुकांतुन स्वत:ला घडवत जातो . हा सारा ' स्व' चा प्रवास खुप कष्टाचा असला तरी त्यातुन मिळनारा आनंद, समाधान हे अनमोल असत. कारण तो आपण स्वत: कमावलेल असत. चुकाही आपनच केलेल्या असतात आणि त्याला दुरुस्त करणारे पण आपणच असतो. पण खरच आपल्याला ज्यांनी साथ दीली नाही त्यांना खुप खुप धन्यवाद द्यायला पाहीजे. त्यांच्यामुळेच आपण स्वत: ला योग्यरितीने घडवु शकलो.
अशा प्रकारे जर आपण दुसर्या बाजुचा म्हणजे स्वत: च स्वत:ला घडवन्याच्या विचाराने वागलो तर नक्कीच जीवनाचा प्रवास अधिकच मजेशीर , आनंद देनारा , तितकाच समाधानी होईल. कारण स्वत: च स्वत: ला घडवताना आयुष्यात येणारे चढ उतार एक नवीनच अशी जगण्याला उमेद , नवीन कलाटणी भेटते. कारण " हम से है जमाना , हम जमानेसे है नही."


शीतल वाघ देशमुख
नवी मुंबई