मोद

Started by शिवाजी सांगळे, April 15, 2017, 08:18:31 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मोद

कुणाला ना खंत  न कुणा खेद झाला
जाण्याने माझ्या  काहींना मोद झाला

थांबले कोण कधी कोणा खेरीज येथे
चाललो एकटा न् काय गहजब झाला

जगतोच मुळी नित्य मनसोक्त मोकळा
तरी ही वागण्याचा का अर्थ गूढ झाला

संघर्ष जगण्यास सारखा तुमचा माझा
जगलो स्वछंदि न कशाचा मोह झाला
     
कशाला ती पर्वा उगा करावी कुणाची?
जगण्या मनसोक्त शिव हा मुक्त झाला

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९