रंगारंग गजरा

Started by पल्लवी कुंभार, April 17, 2017, 01:08:16 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

रंग रंगात रंगला, मनभावन गजरा
कळ्याकळ्यांत गुंफला, मनमोहक गजरा
फुल एक वेचता, अंतरंगात डोकावला
गर्द पानात बांधला, आठवणींचा मोगरा
पहिल्या भेटीत 'ती'च्या, शरमेचा हाती मोगरा
'ती'च्या केसात माळला, हलकेच गजरा
सुगंध चौफेर पसरला, गंधाळला मोगरा
हरएक भेटीत आता, प्रेमाचा माळे गजरा
होता उशीर भेटीला, मोहोळ खुलवे गजरा
दिवसामागून दिवसाला, रंग चढे प्रीतीचा
रंग रंगात रंगला, मनभावन गजरा
'तो'ही दिवस आला, तीन पेढीत सजला गजरा
येता समीप तिच्या, मनतृप्तीत दिस रंगला
नवनवीन प्रसंगाला, माळला अनुभवांचा गजरा
सुगंधात आज रंगला, सत्कार्याचा गजरा
हात हाती सोबतीचा, वळणावर आयुष्याच्या
मनात सडा पडला, सुगंधीत क्षणांचा
क्षणाक्षणांत दडला, मोगरीचा गजरा
गजऱ्याने आज पाडला, आठवणींचा झरोका
रंग रंगात रंगला, मनभावन गजरा