मैं शायर बदनाम

Started by शिवाजी सांगळे, April 17, 2017, 06:35:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मैं शायर बदनाम

१९८० चा काळ हा हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ मानला गेला आहे, खरंच त्या काळातील गीतकार, संगीतकार व गायक यांनी खऱ्या अर्थाने तो काळ गाजवला. अनेकविध अवीट गाणी आजही मनात पिंगा घालतात. गुलजार याची कथा असलेला व हृषिकेश मुखर्जीनी दिग्दर्शित केलेला १९७३ सालचा चित्रपट म्हणजे 'नंमक हराम' मधील गीतकार आनंद बक्षी व राहुल देव बर्मन यांच संगीत आणि किशोर कुमार यांनी गायलेलं एक अजरामर गाणं म्हणजे
'मैं शायर बदनाम, हो मैं चला, मैं चला
महफ़िल से नाकाम, मैं चला, मैं चला'

१९७३ साली जेमतेम मी पाचवीला असेन, चित्रपट, त्याहुनही गाणी वगैरे कळत नव्हतं, पण  राजेश खन्नाचा 'हाथी मेरे साथी' पाहिला होता, म्हणून तो आवडायचा. खरं तर 'नंमक हराम'ची कथा त्या काळाला अनुसरून मुंबईतील मिल मालक व कामगार यांचा संघर्ष मध्यवर्ती ठेवून लिहिलेली व तीला  हळूवार प्रेमाची व मैत्रीच्या नात्याची गोष्ट जोडलेली होती. कामगार नेता  राजेश खन्ना व फॅक्टरी मालक अमिताभ बच्चन यांच्यातील वैचारिक मतभेदातील कसदार अभिनयाची जुगलबंदी दाखविणारा हा सिनेमा.

या सिनेमातील 'दिये जलते हैं फूल खिलते हैं', 'नदिया से दरिया, दरिया से सागर' ही  गाणी सुद्धा खऱ्या अर्थाने ग्रेट आहेत पण मला भावलेलं, नायकाची हतबलता त्या मुळे आलेलं नैराश्य, व्यसनाधीन झालेली मानसिकता व जगण्याची संपलेली आशा  प्रतित करणारी वृत्ती दर्शवणारं गाणं म्हणजे...
'मैं शायर बदनाम, हो मैं चला, मैं चला महफ़िल से नाकाम' हे होय.

मैं शायर बदनाम, हो मैं चला, मैं चला
महफ़िल से नाकाम, मैं चला, मैं चला

मेरे घर से तुमको, कुछ सामान मिलेगा
दीवाने शायर का, एक दीवान मिलेगा
और इक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम

शोलों पे चलना था, काँटों पे सोना था
और अभी जी भरके, किस्मत पे रोना था
जाने ऐसे कितने, बाकी छोड़के काम

रस्ता रोक रही है, थोड़ी जान है बाकी
जाने टूटे दिल में, क्या अरमान है बाकी
जाने भी दे ऐ दिल, सबको मेरा सलाम

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919422779941/+919545976589 Email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९