आज बोलायचंय मला

Started by yogita ghumare, April 21, 2017, 01:35:50 PM

Previous topic - Next topic

yogita ghumare

बाबा तुमच्याशी खूप काही बोलायचंय मला
भरपूर काहीतरी सांगायचंय मला ,
खूप स्वप्न आहेत हो माझी ,
प्रत्येक स्वप्न सत्यात उतारवायचंय मला ,
तुमच्याशी खूप काही बोलायचंय मला


एक खूप मोठं स्वप्न आहे माझं की ,
तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायचेत मला ,
लहानपणी तुम्ही बोट धरून चालायला शिकवलं ,
आता म्हातारपणी तुमची काठी बनायचंय मला ,
तुमच्याशी खूप काही बोलायचंय मला

खूप लांब राहिले तुमच्यापासून ,
आता एक दिवस तरी तुमच्यासोबत रहायचंय मला ,
आजपर्यंत तुमच्या इच्छेनुसार जगत आले ,
आता फक्त एक दिवस मनमोकळेपणाने जगायचंय मला

                                          - योगिता घुमरे