एकटीच होते कोठडीत माझ्या अन सोबत होत्या भिंती त्या मुक्या मनाच्या...!!

Started by tulsi, April 21, 2017, 03:03:57 PM

Previous topic - Next topic

tulsi

एकटीच होते कोठडीत माझ्या  अन सोबत होत्या भिंती त्या मुक्या मनाच्या...!!

आठवडा भर डोळ्यासमोर रेंगाळत असलेली सगळी कामं रविवारी करूया असा विचार करत करत शेवटी रविवार आलाच.. खूप दिवसांनी खिडकीतून येणाऱ्या कवडस्यांनी माझी झोप मोडली होती एरवी तर गजराच्या आवाजाने दिवस सुरु होतो. कॉफी चा मग घेऊन  खिडकी जवळ निवांत बसले. खाली पोरं सुट्टी आहे म्हणून बागडत होती.. काही घरांतून गाण्यांचा आवाज येत होता.. काही घरांत टी time  मेहफिल जमली होती... लगबगीचं  वातावरण.. कसलाच आवाज नको म्हणून खिडकी बंद केली.. sliding बंद होण्याचा खटकन आवाज आला आणि शांतता पसरली... घरात...  मनात... . machine सारखं झालं आहे जीवन...!! अगदी घड्याळाच्या काट्यांवर.  भावनाहीन.  आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, लोकं यांना समजून घ्यायला बहुधा आपण फार उत्साही असतो. कारण आपल्याला त्यांच्याशी deal करायची असते.
पण या सर्व धावपळीत आपण आपल्यालाच विसरतो. आपल्यातहि कोणी तरी आहे ज्याला आपल्या attension ची गरज आहे, हे आपण लक्षात पण घेत नाही.
सतत बाहेरच्या जगात adjust होण्याचा ध्यास. कशासाठी? आपल्याला कोणीतरी वाईट judge करेल हि भीती का बाळगावी?

" Be you ..! let the world adjust " हे फक्त whatsaap  status मधेच का लिहावं ? लोकांना दाखवायला? कि, see how bindhasss I am  ?? आणि reality  काय ?? तर स्वतःला स्वतःचं अस्तित्वच नाही..! कायम दुसऱ्यांना impress करण्यात  गुंतलेले.
प्रवाहासोबत राहावं लागतं हे बरोबर आहे पण फरपटत नेऊ नये स्वतःला.
    एखाद्या वळणावर मागे पाहिल्यास अस वाटेल कि, पूर्ण आयुष्य दुसर्यांचा विचार करण्यात व्यर्थ घातलं स्वतःसाठी तर जगलोच नाही..! 
दुसऱ्यांची बरोबरी करता करता आपण कधी एकटं पडतो काळतहि नाही. आयुष्याच्या अथांग सागरात आपली नाव नुसतीच पुढे पुढे चालत राहते . एकवेळेला चालून दमतो आणि किणारा शोधू लागतो.  वाटेत लागलेल्या दगडाला किनारा समजून त्यावर विसावतो, पण नंतर उमगतं अरेच्चा ...! हा तर आपल्याला हवा असलेला किणारा नाहीच. आणि मग दुखावतो. कधी कधी एवढं दुखावतो कि सावरणं कठीण होतं. आपल्या पैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी असं घडतं.
एकटे पडल्यानंतर अश्या काही चुका करतो कि त्या वेचणंहि होत नाही आणि मग त्या न्याहाळण्यातच सारं आयुष्य जातं.
पण  जर आपणच  आपल्याला वेळ दिला, समजून घेतलं, आपल्या priorities ओळखल्या तर आपण mentally balanced राहू, आणि कदाचित चांगल्या वाईट किनाऱ्यातला फरक ओळखू शकू ...
   असे एकामागून एक विचार डोक्यात सरत गेले, कवडसे प्रखर अन उष्ण होत गेले, आजूबाजूची लगबग स्थिरावली, coffee  संपली mug रिकामा झाला..  आणि वाटलं रविवार रेंगाळलेली कामे करायला असतो तसा गोंधळलेले विचार आवरायला पण वापरायला हवा...!!