गुरूच्या कविता..

Started by Balaji lakhane, April 23, 2017, 07:39:24 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

-------------गुलाबी कविता--------------

पेपर झाले,
सुट्टया लागल्या,
तू तुझ्या घरी आणि
मी माझ्या घरी, 
कितीही दुर असलं तरी,
प्रेम कुठे कमी होतं..

तुझ्या मनाला जोडणारी,
प्रेम नावाची दोरी
आहेच ना मग,,
सतत "तू" आहेस,
प्रत्येक क्षणात,
आणि वाहतेस,
तूच फक्त
माझ्या मना-मनात,

प्रिये,,,
आजून तेच सुरू आहे,
तुझ्यासारख्या ,
गोड गुलाबी कविता,
आणि तुझ्या आठवणी,
एकदम मस्त झक्कास ,
चाललेत दिवस..

पण तुझं ते गुलाबी,
ओठावरचं "तीळ"
सतवतयं प्रिये..
मन तर कधीच शांत
राहत नाही,
सारखी तुझीच चर्चा,
तुझेच विचार मनात..

अगं पिल्लू ,
आपण दोघे कितीही,
दुर असलो तरी,
कधीच दुरावा नाही येणार,
"प्रेमात"..

----------बालाजी लखने(गुरू)----------
          उदगीर जिल्हा लातूर
          भ्र...८८८८५२७३०४