अशास्वत जग..!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 24, 2017, 09:47:06 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

अशास्वत जग ...!!
---------------
दू:ख ही कवटाळती मोठेपणाचे 
वर वरचे हे हासणे मानीपणाचे 
**
दिसतो हा वाडा चौसोपी सुंदर
हे श्रीमंती लक्षण कर्ज बाजारीपणाचे
**
प्रत्येक विटेवरी वाजतो डंका तुझाच
प्रत्येक वागणे भासे तुझे खुळेपणाचे
**
बाजूस थवे बघ दिसती तुझ्या माणसांचे
चालणे तुझे बघ केव्हढे एकलेपणाचे
**
हजारदा तु फेकलेस तुझ्या अश्वासनांना
लाविलेस तु झेंडे तुझ्या अहमपणाचे
**
खेळतोस खुशाल रांगड्या मस्तीत तू
तुज ठाऊक नाही हे खेळ अशास्वतपणाचे
**
काय घेऊन आलास ! काय घेऊन जाणार तू ?
सोड तू हे विचार सारे अजाणतेपणाचे
**
प्रकाश साळवी
२१-०४-२०१७
९१५८२ ५६०५४