एक झाड

Started by Dnyaneshwar Musale, April 28, 2017, 09:49:36 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale


एक झाड लांब लांब
फांद्या असणारं
दुरूनही जवळ घेऊन
येणारं,
एक झाड माळरानात एकटच
चिडीचीप उभं असणार
मायेचं प्रेम कुणा ना कुणासाठी
जपणार.

एक झाड कधीही न बोलणार
रोज नव्या उमेदीच बीज पेरणार
एक झाड वादळ वाऱ्याशी तग
धरून धीट राहणार
वाटसरुला शांत स्वप्नात पाहणार.

एक झाड दुसऱ्यासाठी
झिजण्याचा  ध्यास देणारं
सृष्टीला नवा श्वास देणारं.

एक झाड अथांग समुद्र
तिराशी उभं असणार
लाटांशी खळखळूण हसणार.

एक झाड बागेत रोपटं
म्हणुन असणारं
चिमुकल्यांसोबत लपंडाव खेळणार.

एक झाड बांदावरून शेताच
राखण करणार
बाळाला शांत झोळीत
निजवणार.

एक झाड प्रत्येकाला
हवं हवं असणार
माणसाशी
माणुसकी जपणार.