चाल तू एकटीच

Started by amoul, January 23, 2010, 10:32:16 AM

Previous topic - Next topic

amoul

चाल तू एकटीच शोध तुझी वाट,
सोड हा किनारा जुना, सोड जुनी गाठ.

सोबती सुख दुखाचे सांग किती होते,
ज्याचे दुख भोगणे त्याने हे नियतीच गाते.
पडलीस अडखळून जेव्हा कुणी दिला हात,
संकटे तुझ्या पदरीची तूच कर मात.

वेळ वेडी एकटीच शोधते आधार,
वाटेतच पडते सोसते पावलांचा भार.
राहलीस सदा उपेक्षेच्या अंगणात,
ह्या खोट्या दरबारात कशी तेवेल लाजेची ज्योत.

नवे जग नवे युग हो स्वतः मोकळी,
रडलीस एकटी जेव्हा होते का कुणी त्यावेळी,
तोड जुन्या साखळ्या सोड जुनी कात,
भास आता नित्य नवी झेप घे प्रकाशात.

खंबीर हो अशी ,अजून गेली नाही वेळ,
नवनिर्मिती सोसण्याचे केवळ तुझ्या अंगी बळ,
कठोरता दे नाजूक पापण्यांना शोध कुणी केला घात,
सांग झंकार नाही खंकार तुझ्या कंगणात.


...............  अमोल

santoshi.world

mastach !!! ............ khup khup avadali ............. thanks :)

MK ADMIN


Shyam


rugved

Khupach Chan Aahe  :)
Thank You So Much!!!