निसर्ग शाळा

Started by Balaji lakhane, May 07, 2017, 12:08:31 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

-----------निसर्ग शाळा----------

उंच उंच डोंगर रांगा,
वाहती छोटी मोठी झरे.!
हिरवे गार निसर्ग पाहून,
मन आनंद होऊन फिरे.!

         पाऊस होता रिमझिम
         त्यात वारा होता बोलत.!
         पाखरे गात होती गाणी,
         तेव्हा मोर होता नाचत.!

खळखळ खळखळ
करत वाहत होती नदी.!
नदीच्या काठा वरती
केली सर्व प्राण्यांनी गर्दी.!

         नदीच्या काठावरती आता,
        भरली प्राण्यांची शाळा.!
        चित्ता कोल्हा माकड हत्ती,
        यांनी आणले खडू अन् फळा.!

रिमझिम पावसात एका,
सुरात सारेच लागले गाऊ.!
चल रे मित्रा आपण सारे
मिळून निसर्ग शाळेत जाऊ.!

-------बालाजी लखने(गुरू)--------
        उदगीर जिल्हा लातूर
        भ्र...८८८८५२७३०४

मिलिंद कुंभारे