अदभूत दिवस

Started by vijaya kelkar, May 13, 2017, 01:58:51 PM

Previous topic - Next topic

vijaya kelkar


   अदभूत दिवस

दामिनी तळपती कडाडून
दाट गडद काळ्या जलकुंभातून
दावी नृत्यकला दशदिशातून
दान गान अमृत धारांचे ||
   मदमस्त पवनारूढ मेघ पलटण
   मजल दरमजल कूच करणं
   मनसुबा, टपाटप करू आक्रमण 
   महीवर पाट वाहिले ||
लेकुरवाळेनदी-नाले वाहती
लेणी हिरवी ल्याली क्षिती
लेखाजोखा आनंदाचा वर्णू किती
लेशमात्र मळभ नाही उरले  ||
   रेशीम स्पर्श होता नव सूर्याचा
   रेणूरेणूत पूर नव चैतन्याचा
   रेखीव कलात्मक ढंग निसर्गाचा
   रेतीत चमकले शंख-शिंपले  ||
खारा वारा साद देई नारळी पोफळीस
खाजगीत सांगे संदेश मयंकास
खाणा खुणा करी सागरास
खाशी गंमत, अदभूत घडले  ||
   खुदू खुदू वारा हसला
   तुरु तुरु ढग वर चालला - - - - -
   

         विजया केळकर