जलधरा

Started by विक्रांत, May 15, 2017, 11:08:32 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


जन्मोजन्मीची तहान
आणि शिवलेले ओठ
गाठी पडता पडता
पुन्हा होय ताटातूट ||

एका जन्मात भेटून
एका जन्माची ही दरी
हात फैलावून उंच
दोन्ही हाताची पोकळी ||

काही स्पर्शते स्पर्शाला
पण आकळत नाही
जीव भरला तृषेने
जल ओघळत नाही ||

लुप्त सरिता प्रवाह
आहे उरात अजून
आस डोळ्यात दाटते
स्वप्न पाहते सजून ||

येई जलधरा जरी 
वाटा गेल्या हरवून   
वर्षा युगांनी देवून
मज नेई रे वाहून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in