जीवनाचा शेवटचा खेळ

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 16, 2017, 06:03:15 AM

Previous topic - Next topic
श्वास माझे तुझ्यासाठी
काही काळ थांबले होते
जीव माझा जात होता
पण प्राण तुझ्यात अडकले होते

शेवटच्या क्षणी सुद्धा श्वास
माझे अडखळले होते
तुझा चेहरा एकदा पाहण्यासाठी
हृदयाचे ठोके अधून मधून चालु होते

शरीराची आता माती होणार
याची खात्री झाली होती
काही क्षणात जीवन यात्रा आता
संपणार याची चाहूल मज लागली होती

भरलेल्या डोळ्यांत माझ्या फक्त
तुला एकदा पाहण्याची इच्छा होती
जीवनाचा शेवटचा खेळ माझ्या
सोबत ही दुनिया खेळत होती

पायदळी प्रेमाची फुले
लोकं तुडवत होती
जातीच्या नावा खाली आज
माझ्या प्रेमाची अंत्ययात्रा निघत होती

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर