असह्य मरन....

Started by suraj-123, May 21, 2017, 03:11:59 PM

Previous topic - Next topic

suraj-123


विषाचे पेय पिण्यास घेतले.
चीमुकळ्या लेकरांच्या मायेनं,
मनी काळजीचे काहुर उठले.
हातातला विषाचा पेय बाहेर फेकुन,
पुन्हा जगावेसे वाटले.

कितीदा आता मनाला,
माझ्या समजुत घालायची.
उरातलं दुःखं कीती काळ,
मनात पचवुन ठेवायची.
दारीद्र्याचं आेझं डाेईचं त्याला,
कीतीकाळ सांगड घालायची.

असह्य हे मरनही मला,
त्यागनं कठीण झालं आहे.
मायेच्या पाझऱ्यामुळं,
जीवन जगने भाग पडले आहे.
अंश्रुचा आेघ पापणीआडं,
मी गाेठवुन ठेवला आहे..

दिस-रातं मेहनत करायची,
पाेटाची खळगी भरायला.
जीव मारून पैका साठवायचा,
पाेरांस्नी शिकवायला.
शिकुन तरी दिस बदलतील,
जगताेय मी आशेला.

सावकराचं करजं अनं त्यात,
दुष्काळाचा सावट .
यात हाेरपळुन निघालाेय.
आमच्या उत्पन्नाचा बाजारभाव यांनी,
कवडीमाेल रूपयांत आता मांडलाय...
कवडीमाेल रूपयांत आता मांडलाय...

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
     मुरबाड(ठाणे)


https://kavyasakhadnyaneshwarthorat.blogspot.com