मोकळे मन

Started by yogita ghumare, May 22, 2017, 08:46:33 PM

Previous topic - Next topic

yogita ghumare

आजच्या या नवयुगात असते का कुणाचे मन
मोकळे
यांच्या डोक्यात कोणत्या न कोणत्या गोष्टीचे स्क्रू नि खिळे

यांना नसतो वेळ दुसऱ्यासाठी
ना कुटुंबासाठी , ना  स्वतासाठी
या व्यस्त माणसांना आवडत नाही का मन मोकळे करायला

मित्रांना , कुटुंबियांना आणि स्वतःला वेळ द्यायला
काय याना फक्त काम आणि पैसा महत्वाचा असतं
की यांना दिलासा देणार कुणी नसतं

काय माहित ही व्यस्त लोकं कधी मन मोकळं करणार ?
पण तोपर्यंत फक्त वाट पहावी लागणार .....

                                - योगिता घुमरे