सरणावरचे गाणे

Started by Kumar Sanjay, May 24, 2017, 04:10:33 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

पाठीवर बांधून कुणी
जीवनाचे बिर्हाड चालतो
प्रत्येक पाऊलागणिक
हळुवार रोज मरतो


उरतो खेळ कितीदा
जगण्यातील वेदनेचा
रस्त्यावर अजून भेटतो
अश्वत्थामा जखमेचा

कित्येक जन्माचे दुःख
श्वासात गुदमरत उरते
गोठलेला आंसवाना
हुंदक्यांतून मोकळे करते


देहावर चालून येते
गतजन्माचे थोडे देणे
जगण्याला रडवुन जाते
सरणावरचे जळते गाणे

# कुमार संजय

7709826774