रामा,तुझा वनवास अजुन संपला नाही

Started by Rajesh khakre, June 03, 2017, 03:33:13 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

माणसातला राम अजून जागला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही !!धृ !!

मनात तू,ध्यानात तू, प्रत्येका ह्रदयात तू
अणुत तू, रेणुत तू,भजनी,गाण्यात तू
इथला दुष्ट रावण अजून वारला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही  !!१!!

ह्या कोर्टात,त्या कोर्टात तुझी सुनावणी चालू
सिद्ध कर स्वतः ला, तू असला तरच मानू
तुझ्या जन्मभूमीचा वाद अजून मिटला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही  !!२!!

बघितलतं ना आमचा न्याय कसा तुला वाटला?
साठ वर्षात देवा तुझा श्वास असेल ना कोंडला
आमच्या कोर्टाची पायरी तू पुन्हा चढणार नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही  !!३!!
--- राजेश खाकरे मो.7875438494