आठवणीतील पाऊस

Started by गौरांश, June 04, 2017, 11:31:11 AM

Previous topic - Next topic

गौरांश

त्या रात्री पाऊस होता अन् त्या पावसात मी
एकटा येथे जरी असलो तरीही "ती"च ध्यानीमनी

पाऊस येता येतात तिच्या आठवणी
वाटत नाही मनाला घेल तिची जागा कोणी

चांदण्याची छाया सरीं वर पडलेली
माझ्या प्रेमात ती ओलिचिंब भिजलेली

भिजलेले तिचे केस अलगद सरकतात बोटातून
पाण्याची चव वाटते चाखावी तिच्या ओठांतून

विजेचा आवाज होता घ्यावे तिला कवेत
श्वासांचा मृदुंग नाद पसरेल थंड हवेत

मंद पाऊस थंड वारा
स्पर्श होता तिचा येतो शहारा

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली
सोडून दूर जाऊ नकोस हीच आशा फक्त उरलेली

पावसाच्या या मंद धारा टोचतात मनाला
डोळ्यातून आसवे काढणे जमत नाही त्या उन्हाला

हा पाऊस मला तिच्या आठवणीमध्ये भिजवतो
टपटप अशी साद घालून सारखा सारखा खिजवतो

वेळी अवेळी पाऊस पडता आनंदने मी भिजतो
भिजता भिजता वाहत जातो मीच माझा नसतो
         गौरांश.पुणे (मो.9527337073)

Sagar Kamble



विजय वासेवाड