भय मार्ग

Started by शिवाजी सांगळे, June 09, 2017, 11:18:24 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भय मार्ग

सोसायचे किती वार भूकेल्या नजरांचे
वाहायचे कसे डाग ओलेत्या जखमांचे

आक्रंदती मनातून...गात्रे हाेउन म्लानी
कोंडून राहती भाव...सारे आत मनीचे

तूम्हा न सांगता काहि लावूनी इथ बोली
देती विकून देहास......बाजारी मरणाचे

पैसाच येथला देव.....त्याचे पूजक सारे
तोची कमावती मोल लावूनी जगण्याचे

हा खेळ खेळतो कोण दावूनी भय मार्ग
खोटेच चालती डाव..जींकूनी हरण्याचे

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९