खेळ

Started by पल्लवी कुंभार, June 10, 2017, 10:27:21 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

एक डाव खेळाचा
असा मांडला
क्षण मोठ्या शिताफीचा
असा रंगला

भाग्य होते साथीला
खेळाच्या अंताला
खेळ तसाच आखला
विचारी रुपरेषेचा

घेऊन फुरका मौजेचा
श्वास रोखला
होऊन गंभीर मोक्याला
ठोका वाढला

हार-जीत समेला
असतेच हरेक खेळाला
अनुभव वाढे गाठीला
आत्मविश्वासी क्षणाचा

Rohan Sachin Aradwad

वाचनावर कविता यमक जुळणारी