बाप

Started by abhishek panchal, June 10, 2017, 11:11:20 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

जातो माझा बाप शेतावर
त्याची माया पूरी पिकावरी
गाय गुरे त्याचे साथी खरे
पुऱ्या जगाची रे चिंता उरी

देती त्याला दगा सारखा
पाऊस वारा , माणूस सारा
देऊन सारे , देह भावाने
जगी कुठे ना , त्याला थारा

रडतो माझा , बाप सारखा
जगी असा हा , एक पोरका

मंत्री येतो , संत्री नेतो
हाती उरते माती
सोने करतो , त्याच मातीचे
तेही लुटून नेती

हात पसरतो , खरा पोशिंदा
हक्कासाठी रोज
मंत्री देतो आश्वासने
कर्जाचे ते बोझ

पैका नाही ,
अडका नाही ,
नेहमीची ती कडकी

घर नाही ,
दार नाही ,
नाही साधी खिडकी

शेतावरती जन्मही जातो ,
जगण्याचीही धडकी

घरही जाते ,
शेतही जाते ,
राहते खोली पडकी

- अभिषेक पांचळ ,पुणे
( ९०२८८७५९५८ )