आगरी कविता

Started by pikaleved@gmail.com, June 15, 2017, 11:16:36 AM

Previous topic - Next topic

pikaleved@gmail.com

शेतांचा लांबा
पिक कसला डवरलाय
एकुक चोऱ्याला म्होप
आलीन सोन्यासारी कनसा
पुन मदी मदी चोरून बघतंय लांबा

नंद्रला परलाय तवा काराला व्हया
पुऱ्ह्चे वर्षी उंगवाला कल्हा
चंगले पिकाची नासारी व्ह्वाची
चालाचा नाय बियाला
पुन मदी मदी चोरून बघतंय लांबा

लांबां ह्यो गवत नाय
पिकान हाय बिसरा पिक
लांब्याचा दाना तांबरा तांबरा असतंय
मंग या लाल लाल चावलांची
चव लय भाकरीला
पुन मदी मदी चोरून बघतंय लांबा

लांब्याचं पव्हं लय भारी
चहान खावाला सकालचे पारी
आगरयाचा पोर खातंय न्ह्यारीला
तेच असतान पोटभर गरीबाला
पुन मदी मदी चोरून बघतंय लांबा

- चंद्रकांत भोईर