आगरी गुलकंद

Started by pikaleved@gmail.com, June 15, 2017, 11:25:07 AM

Previous topic - Next topic

pikaleved@gmail.com

आगरी बोलीचा आगरी गुलकंद
चाखा गरे थोरा थोरा
आगरी बोलीचा गोरवा
वाटं गरे घेवासारा

आगरी गुलकंद ठेवा मोलाचा
जपलंय नये पिऱ्हीनी
उंघरा कंदी पुन दालन
मिलल हातान कती पुन वर्सानी

आगरी गुलकंद हाय आगरी बोलीन
जीताऱ्यांचे कांज्यांन न चावलाचे भाकरीन

आगरी गुलकंद हाय आगरी बोलीन
पोरा टोरांचे कष्टान
वार वारीलांचे इष्टेकिन

नये नये इचारान
आगरी अनमोल ठेवा
वर्सान वरसे येयील गंध
अस्सा हा "आगरी गुलकंद"

-चंद्रकांत भोईर
(पुस्तक : आगरी गुलकंद)