खिडकी पाशी जाऊन बसतो

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 15, 2017, 09:02:12 PM

Previous topic - Next topic
कधी कधी आठवण आली
तर खिडकी पाशी जाऊन बसतो
ती पुन्हा त्या वाटेनं जाईल
ही खोटी आस मनात धरून असतो

अलगद थेंब गाली ओघळतो
पुन्हा त्या थेंबाला निहाळत असतो
तिचा चेहरा दिसतो का
ही खोटी आस मनात धरून बसतो

घड्याळाची वेळ जेव्हा
पाहतो तेव्हा मनात काहूर उठतो
शांतता पसरली जाते बाजूला जेव्हा
सेकंद काटा संध्याकाळ ची जाणीव देतो

मग पुन्हा आठवणींचे
डोंगर उंच उंच होत जातात
अन डोळे तुला पाहण्यासाठी पुन्हा
त्या वाटेवर मागे वळून पाहतात


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर