वाट

Started by गणेश म. तायडे, June 16, 2017, 12:27:07 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

न्हावुनी जावे मन
या चिंब पावसात
कधीतरी कोसळेल
हा माझ्या अंतरात

वाट पाहतोय ऐसा
जणू श्वास दाटलाय
येऊनि बरस तू
माझ्या अंगणात

थेंब ओघळावा
गाली नकळत
दुःख हि भिजावे
तुझ्या अलिंगणात

सांग कधी येतो
मिठीत मज घ्याया
सुगंध मातीचा
पुन्हा दरवळाया

आतुरलेले मन
तहानलेले रान
डोळे लावूनी
वाटेवर हे माळरान

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11