कविता ॥ किती उरलेत श्वास आता , मला माहीत नाही ॥

Started by siddheshwar vilas patankar, June 16, 2017, 06:23:50 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



किती उरलेत श्वास आता

मला माहीत नाही

सोडशील ना अट्टहास आतातरी

तुझ्यावाचून राहवत नाही ॥

युगानुयुगे तू माझीच राहावी

हाच ध्यास मनी बाळगला

दुर्दैव माझे , तुला दुसऱ्याबरोबर पाहावी

या जन्मातच तू दुसरा हात पकडला ॥

सांग मला , कुठे पडलो कमी ?

पैसा पाणी मुबलक होता

प्रेमाला पूर आलेला

अजून कुठली पाहिजे होती हमी ? ॥

माझ्या सावलीचा इतका तुला जाच झाला

तू लगेच दुसरा हात पकडला

ज्या हातानी तुझ्या हाताची स्वप्नं पाहिली

त्याच हातांनी आज तुझ्यावर अक्षता टाकली ॥

मी काहीच बोललो नसतो

तुला बोहल्यावर चढताना बघून

राखलेल्या संयमाचा अंत झाला ॥

का बोललो नाही, याची झळ त्या प्रदीप्त अग्निकुंडातून

अक्षता टाकताना मला बसू लागली

इतकी बसली

कि तुझी आठवण येऊन अक्षतेचा प्रत्येक दाणा

माझ्या मूक मनाप्रमाणे जड झाला होता

एक मात्र नक्की , माझ्या अंत्ययात्रेचा प्रवास सुरु झाला होता ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C