आयुष्य

Started by गणेश म. तायडे, June 18, 2017, 12:04:54 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

आयुष्य म्हटलं की जो तो आपलं वय आठवतो. गेलेलं आयुष्य आणि राहिलेलं आयुष्य यातलं अंतर शोधतो. पण सध्या जगताना कुणीच आयुष्य समजून घेत नाही. नुसती चाललेली धावपळ आणि पैसा मागे लागलेली जीवघेणी शर्यत कधीच संपणार नाही असे वाटू लागले आहे.

निघून जाते आयुष्य
खिसे आपुले भरताना
वेळ जाते निघून
दिवस रात्र धावताना
हरवून गेले आहे सारे
सुख विकत घेताना
क्षणभर हसणे सुद्धा
महाग झाले लोकांना
विसरलीत नातीगोती
सारे जवळ असताना
धावपळीचे आयुष्य
निमूटपणे जगताना
आयुष्य आहे सुरेख
कुणीच पाहत नाही
नुसती दगदग सुरु
वेळ कुणाजवळच नाही
बसून मित्रांसोबत
आज कुणी बोलत नाही
सुखामागे धावताना
माणूस आज हरवला आहे
हातच सुख सोडून
दुःखामागे लागला आहे
आयुष्य काय आहे
आज कुणाला कळले नाही
जगण्याचे गुपित कोडे
कुणालाच उमजले नाही

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11