कविता ॥ मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली ॥

Started by siddheshwar vilas patankar, June 22, 2017, 06:06:26 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली

माझी आई नेहेमीच नाक मुरडत बसली

सलमा बद्दल बोललं तर मी पाकिस्तानी

शायना बद्दल बोललं तर इंग्लीस्तानी

साल येडं व्हायचं बाकी होतं

एकदम विचित्र चालली होती जिंदगानी

तिकडं सलमा अल्लाचा वास्ता द्यायची

इकडं शायना नेहेमी पास्ता आणायची

नेहेमीच प्रश्न पडायचा मला

या दोघींमधली कोण निवडायची ?

दिली आणून एक भगवद गीता

सांगितलं हे जे कुणी मोठ्यानं वाचंल

तीच होईल माझी सीता

तयारी सुरु झाली

सलमानें नमाज पढायला घेतला

शायनाने बायबल ऑनलाईन म्हंटली

मला मात्र माझ्या वेडेपणाची लाज वाटू लागली

कुणाला तरी एकीलाच नादि लावायला हवं होतं

दोघींशी असं खेळायला नको होतं

मी ठेवुनी गीतेवर हात , सार कबूल केलं

दोन्ही आधी माझ्या मागं मागं होत्या

मग शिव्या श्राप देऊन त्यांनी सार वसूल केलं


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C