अनोळखी सारखा एकटे पणा

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 24, 2017, 07:07:33 AM

Previous topic - Next topic
माझ्या खिडकी वर जाऊन
बसला आहे माझा अनोळखीे
सारखा एकटे पणा
हळूच कोठून तरी वारा येतो
अन एकटे पणाला दूर घेऊन जातो

ते खोटं हसू चेहऱ्यावर आणतो
अन पुन्हा मनाची
फसगत करतो
अजून किती दिवस फसवू मनाला
मी माझ्याच मनाचा खेळ करतो

आजूबाजूच्या किलकीलाटात
मी मलाच शोधत असतो
अचानक मी कधी एव्हडा
विचारांच्या गर्तेत फसतो

अन कोठे तरी आडोशाला
जाऊन मी लपतो
पुन्हा सावरून उडण्याचा प्रयत्न करतो
तिच्या आठवणीनं पुन्हा शोधुन
छळलं तर मी पुन्हा अधुरा वाटतो

म्हणून जरा मनाची समजूत काढतो अन पुन्हा त्या एकटे पणात जाऊन अडकतो

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर