जगण्यासाठी ....

Started by Asu@16, June 25, 2017, 07:40:00 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     जगण्यासाठी ....

कधी वाटते जगण्यासाठी,
जीवन उधळुनि द्यावे.
धुंद फुलांच्या गंध कुपितुनि
सुगंध उधळित जावे.

कधी वाटते जगण्यासाठी,
स्वतःच वितळुनि जावे.
जाऊन झिंगुन वा-यावरती,
चुंबुन घ्यावी सारी धरती.

भल्या पहाटे , कधी वाटते
उडुन जाऊनि क्षितिजावरती,
गावी मंजुळ प्रेम कहाणी
मी राजा अन् तू राणी !

परी
कधी वाटते, जगण्यासाठी,
उचलुनि घ्यावी धरती, तरुणी.
फेकुन देऊनि पापकारिणी,
कधी म्हणावी आर्त विराणी

- अरुण सु. पाटील
( मैफल दिवाळी अंक १९७८ मध्ये प्रसिद्ध )

https://www.facebook.com/AsuChyaKavita