शेतकरी संपावर

Started by Pradipkatare, June 26, 2017, 07:47:11 AM

Previous topic - Next topic

Pradipkatare

म्हणुनचं माझा शेतकरी जातोय संपावर......!

पांडुरंगाचं काळीज आज उचंबळुन गेलं
कडवट चहा पितांना साऱ्यांना कळुन गेलं
ज्याच्या जगता जिवावर, त्याच्याचं उठता मुळावर
गळफास लावायची वेळ आली, मोती पिकवणाऱ्या शिंपल्यावर
मेलेल्यांच्या आर्त किंकाळ्या पोहचत नाहीत यांच्या कानावर
म्हणुनचं माझा शेतकरी जातोय संपावर......!

जातीपातीसाठी खुप झालं आता मातीसाठी जातोय
मरुण पडलेली मानुसकी पुन्हा चेतवुन पहातोय
रझाकारी धोरणांनी तुमच्या बळीराजा मातीत गेला
वीज-पाणी-कर्जमाफी तर नाहीचं, बेभाव तुर घेऊन उपकार केला
स्वतःची सत्ता नाही, स्वतःच्या मालावर.....
म्हणुनचं माझा शेतकरी जातोय संपावर......!


दुश्मन होऊ दे दुनिया सारी, तु पांडुरंगा फक्त रुसु नको
खळखळु दे रानातुन पाणी,तु फक्त आता फसवु नको
बरसु दे सरींना सुखी होऊ दे सारा संसार
आता झेपत नाही कर्ज, सोसत नाही दुष्काळाचा भार
बळी जातोय बळीराजाचा,आयुष्य रेटतोय रडत-पडत
चिता पाहुन लेकरांच्या,तुझं काळीज नाही का पिळवटत
जगाला सुतक नाही आमच्या मरण्यावर....
म्हणुनचं माझा शेतकरी जातोय संपावर......!!

📝प्रदिप कतारे
📱८९८३०४२४७८