शेतकरी

Started by smadye, July 07, 2017, 02:02:48 PM

Previous topic - Next topic

smadye

शेतकरी

शेतकरी मी  शेतकरी
पिकावरी  माया करी
शेत माझे माझ्या पोरावानी
उन्हं पावसात मी करी निगरानी

पीक आले जोमात
संचारतो नवा उत्साह अंगात
कापणीची मग जय्यत न्यारी
स्वप्नांची मग असे भरारी

त्या पिकाच्या आशेने
घेतले कर्ज  भारी मोठे
विकून पीक करिन पैका
कर्ज फेडून होईन राजा

पण झाले आहे विचित्र
अपेक्षेपेक्षा दिसते वेगळेच चित्र
बिघडले  वेळापत्रक पावसाचे
रुसूनी गेले पीक माझे

आता काय मी करावे
उत्पन्न नाही तर काय मी खावे
डोक्यावर माझ्या कर्जाचा  बोझा
माझ्यामागे संसाराचा बाजा

काय करावे कळेना
कुठे काही मदत मिळेना
घातली साद सरकारला
पण काही केल्या माझी हाक जाईना

ऐकत होतो कर्ज  झाले  माफ
पण त्याची पावती माझ्याकडे नाही येत
मधल्यामध्ये सर्व गहाळ झाले
माझ्या फक्त कर्जफेडीचे परवाने आले

आयुष्य झाले आहे एक वणवण
संपवायची आहे पैश्याची तगतग
आता मात्र एकच दिसतो उपाय
घालावी गळा गळफासाची माळ

कोण पाहिलं माझ्या परिवाराला
छोट्या छोट्या माझ्या बाळांना
थकलो मी आता देवा ,टाकितो लेकरांचा भार तुझ्यावरी
संपवितो सारे शेवटचा श्वास घेऊनि.....

              सौ सुप्रिया समीर मडये
           madyesupriya@gmail.com