पिल्लू

Started by Asu@16, July 16, 2017, 08:05:50 PM

Previous topic - Next topic

Asu@16

            पिल्लू

चंद्राहून आले सश्याचे पिल्लू,
वाटते करावे गुल्लू गुल्लू
बोट ठेवुनि गालावरती,
जणु बावरले पाहुन धरती

मोठे मोठे डोळे, गोबरे गाल
तोंडाचे बोळके, विशाल भाल
शी, सू ने ते होते हायपर
रडल्याविना बदले ना डायपर

आईच्या कुशीत जग सामावते
आईविना मग पिल्लू भांबावते
आई दिसताच खुलते कळी
गालावर उमटते गोडगोड खळी

हसण्या रडण्याची एकच भाषा
रात्रंदिन झोपेची नशा
सदाच खेळती ताई नि दादा
झोपू आता, उद्याचा वादा

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita