गळचेपी

Started by sanjweli, July 16, 2017, 09:28:30 PM

Previous topic - Next topic

sanjweli

दि. २८/२/२०१७

  गळचेपी

राजकारण गजकर्ण आहे शत्रुचा शत्रु मित्र आहे
सत्तेसाठी चाललेला सारा रडीचा डाव आहे

बहुमताची खाज ही  आज अवघड जागेचं दुखणं आहे
कुणीही असो तर स्वार्थ प्रत्येकालाच आहे

देव दैत्यही एकत्र आले होते आता तर कलियुग सुरु आहे
समुद्रमंथन पहा आता नव्याने घडणार आहे

काहीना अमृत तर काहींना हलाहल भेटणार आहे
हलाहल प्राशीता का नीलकंठ आता पुन्हा अवतरणार आहे

सत्तेचा पारिजात,कल्पवृक्ष,कामधेनु ,चंद्रमा,लक्ष्मी, रंभा
ती सांगा कुणाच्या गळ्यात पडणार आहे

देवास(सेना) की दानवास(भाजपा) देवत्व शेवटी कोणास मिळणार आहे
तख्तापलटण्यासाठी पहा मोहीनी (कॉंग्रेस) बनणार आहे

गळचेपी काय ती ते आता सा-यांना कळणार आहे
घटकपक्षाच्या अस्मितेचे समिकरण पहा कसे जुळणार आहे.

©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143