शायर

Started by sanjweli, July 16, 2017, 09:55:10 PM

Previous topic - Next topic

sanjweli

१४/१२/२०१६

जेथे होतो,
तेथेच आहे,
जसा होतो,
तसाच आहे,

जो तो भेटतो,
लुटण्यास तैयार आहे,
गाफील या दुनियेशी,
हा शायर आहे,

हरतो वा जिंकतो,
याचे कुणास काय आहे,
खेळलेला ना कुणाशी,
कोणता डावपेच आहे,

भोग जो तो भोगतो,
पाप, पुण्य हे चक्रव्यूह आहे,
गीतेचा रचता रचयता,
भगवान नारायण आहे,
कुरुक्षेत्री किंकर्तव्यविमूढ,
बनलेला गांडीव सोडलेला का पार्थ आहे,

जगतो वा मरतो,
मसणवाट्यात प्रत्येकाचा,
दीस ठरलेला आहे,
देतात जाता जाता,
प्रेतास अखेरचा विसावा
अग्नीशी ठरलेला
त्याचा मिलाप आहे

देह प्राणावीन आकंठतो
उग्र त्याचा त्यालाच,
दर्प येत आहे,
कोंबलेली नाकातोंडात,
रुई तुलसीपत्र आहे,
काय ऐट काय मिजास थाट
चारचौघांच्या खांद्यावर,
रामनामाच्या जयघोषात
चाललेली वरात आहे

जो तो हा रुबाब करतो,
अंगी घातलेला,
पांढरा पोशाख आहे,
शेवट हा प्रत्येकाचा,
ठरलेलाच आहे,

अग्नीदाह देहाचा होतो
सावडणं रक्षा अस्थी विसर्जन
दहावा,तेरावा हा सोपस्कार
ठरलेलाच आहे
शेवटी कसा बसा कावळा
शीतास शिवलेला आहे
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143