आत्मा

Started by sanjweli, July 16, 2017, 10:15:36 PM

Previous topic - Next topic

sanjweli

९/१२/२०१६

पेटती रोज माझी चिता,
ना कोणी मुखाग्नी देते,
प्रेत माझे सरणावरती,
एकलेच रुदाली गाते

शीतल चंदनाची काया,
सर्पापरी लपेटुन घेते
जगण्याची भीती वाटते
मरणाची ओढ लागते

बंधने सा-या जगाची,
दिली झुगारुन केव्हांच मी,
निरोप या जगताचा अखेरचा
हसतच घेतला मी,

या दुनियेसाठी जोकर ठरलो,
वापर झाला,होत गेला,
माझ्याच नजरेत माझा,
गुन्हेगार बनलो मी.

मी ना देणेकरी कुणाचा,
पंचतत्वात लीन मी,
राख सावडताना माझी,
अस्थी कुणा गवसणार नाही,

मुक्तीच्याच शोधात फिरतो,
बदलत देह मी,
आत्मा हा परमात्म्याचा खेळ सारा,
शेवटी मरणवाट शोधतो मी.

©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143